Ladki bahin yojana E-kyc”लाडकी बहिण ई-केवायसी मोबाईलवर करा – 5 मिनिटांत प्रक्रिया पूर्ण!”

लाडकी बहिण केवायसी मोबाईलवर करा – 5 मिनिटांत प्रक्रिया पूर्ण!”

लाडकी बहिण योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली योजना आहे.

  • पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 थेट बँक खात्यात मिळतात.
  • यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.

मोबाईलवरून केवायसी कशी करायची?

गुगलवर जा

  • गुगलमध्ये “लाडकी बहिण योजना” असे सर्च करा. http://ladakibahin.maharashtra.gov.in/
  • पहिली वेबसाईट – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना – यावर क्लिक करा.

आधार क्रमांक टाका

  • “लाभार्थी केवायसी प्रक्रिया” बॉक्सवर क्लिक करा.
  • लाडकी बहिणीचा आधार क्रमांक टाका.
  • कॅप्चा भरा → “मी सहमत आहे” वर टिक करा → “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा.

ओटीपी टाका

  • आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर 6 अंकी ओटीपी येईल.
  • तो टाकून “सबमिट” करा.

वडील/पतीचा आधार क्रमांक

  • वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाका.
  • पुन्हा कॅप्चा भरा → “ओटीपी पाठवा” → ओटीपी टाका → “सबमिट” करा.

जर वडील/पती नसतील तर सध्या पर्याय नाही. सरकारकडून अपडेटची वाट पहा.

जात प्रवर्ग निवडा

  • तुमचा जात प्रवर्ग सिलेक्ट करा (उदा. SC, ST, OBC, इ.)
  • दोन प्रश्न विचारले जातील → दोन्हीला “होय” सिलेक्ट करा.

SC – अनुसूचित जाति

ST – अनुसूचित जमाती

OBC- इतर मागासवर्ग

NT-A – विमुक्त जाती अ

NT-B- भटक्या जाती ब

NT-C – भटक्या जाती क

NT-D – भटक्या जाती ड

SBC विशेष मागास

OPEN – सर्वसामान्य

अटी मान्य करा

  • “अटी मान्य आहेत” वर टिक करा → “सबमिट” करा.

तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे स्क्रीनवर दिसेल.

केवायसी झाली की नाही हे कसे तपासायचे?

  • पुन्हा त्या वेबसाईटवर जा.
  • आधार क्रमांक व कॅप्चा टाका.
  • “मी सहमत आहे” → “ओटीपी पाठवा” → ओटीपी टाका.
  • तुमची केवायसी पूर्ण झाली आहे हे स्क्रीनवर दिसेल.

New Update :Ladki bahin yojana | लाडकी बहिण योजनेचा ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ही रक्कम थेट खात्यात जमा होणार

महत्त्वाचे टिप्स:

  • ओटीपी उशिरा येऊ शकतो → पहाटे किंवा रात्री प्रयत्न करा.
  • मोबाईलवरूनच संपूर्ण प्रक्रिया करता येते.
  • शेवटची तारीख जवळ आहे → लवकर करा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top