Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजना ही महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, जी आर्थिक मदत पुरवते. या योजनेला सुरूवात झाली असली तरी, या वर्षाच्या सुरुवातीला अनेक लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का आला आहे. जवळपास 60 लाख महिलांची नाव योजनेतून वगळली जाण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या आणि सत्ताधारी नेत्यांच्या दाव्यानुसार, ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांच्या कडून त्यांना दिलेली रक्कम वसूल केली जाईल.
शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे, की योजनेच्या निकषांची कठोर तपासणी केली जाईल. यामध्ये नियम मोडणाऱ्या महिलांकडून हप्त्यांची वसूली होईल. माजी मंत्री छगन भुजबळ यांचीही अशीच मागणी आहे की, ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले त्यांना स्वतःच योजनेतून नाव काढून घ्यावं.
योजनेच्या निकषांनुसार, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या, चारचाकी वाहन असलेल्या, किंवा आयकर भरणार्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे, योजनेच्या लाभार्थींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
60 लाख लाडक्या बहिणींची योजनेतून वगळणी :
लाडकी बहिण योजना अंतर्गत जवळपास 60 लाख महिलांची नाव वगळली जाऊ शकतात. विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांच्या दाव्यानुसार, नियम उल्लंघन करणाऱ्यांकडून आतापर्यंत दिलेली रक्कम वसूल केली जाईल.
निकषांची काटेकोर तपासणी
शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या दाव्यानुसार, लाडकी बहिणींच्या योजनेच्या निकषांची कठोर तपासणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सर्व हप्त्यांची वसूली करण्यात येईल.
छगन भुजबळांची कारवाईची मागणी:
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चार चाकी वाहन , गव्हर्मेंट वोर्कर ,असे असतील, तर त्यांना स्वतःहून नाव काढून घ्यावे, अन्यथा वसुली दंडासह केली जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले.
योजनेवर सरकारचा संदेश:
महायुती सरकारने स्पष्ट केले आहे की, लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना योजनेतून वगळले जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे.
अपीली आणि अपात्र ठरणार व्यक्तींचे निकष:
महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास, ट्रॅक्टर सोडून इतर वाहन असल्यास, किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास, आयकर भरत असल्यास, आमदार किंवा खासदार असल्यास किंवा कुटुंबाकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असल्यास त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
अर्जांची पुनरावलोकन प्रक्रिया:
राज्यभरातून 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी 2 कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरले. परंतु, छानणी प्रक्रियेमुळे अपात्र ठरणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
निकषांनुसार वगळले जाणारे लाडकी बहिणी:
निवडणुकीपूर्वी अर्ज स्वीकारताना नियमांची ढिलाई केली गेली होती. आता, निकषांनुसार कठोर तपासणी केली जाईल आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वगळले जाईल.